मुंबई/प्रतिनिधी
Buldhana : माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यंदाची सिंदखेडराजा (sindkhedraja) विधानसभा निवडणूक घड्याळ की तुतारी यापैकी कोणत्या जीवनावर लढणार याबाबत आत्तापर्यंत पत्ते उघड केले नव्हते राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ .राजेंद्र शिंगणे (rajendra shingne) यांची पुतणी गायत्री शिंगणे नाराज आहे काकांच्या विरोधात गायत्री शिंगणे बंडाच्या तयारीत होत्या.राजेंद्र शिंगणे यांनी अखेर घर वापसी केली आहे.
” मी पक्षात वापस येतो प्रवेश करत नाहीये अआणी पक्ष नेतृत्व जी काही जबाबदारी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या किंवा बुलढाणा जिल्ह्याच्या बाबतीमध्ये देईल ती संपूर्णपणे करण्याची माझी तयारी आहे.” – आमदार डॉ.शिंगणे”
आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची घरवापशी.
डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अखेर घरा वापस केली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला व जिल्हा बँकेचे काही काम असल्यामुळे मला अजित दादा सोबत जावं लागलं असं आमदार डॉ.शिंगणे यांनी सांगितले.यांचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या मतदारसंघावरील एकछत्री अंमल गेल्या तीन दशकांपासून कायम आहे.१९९५ मध्ये डॉक्टर शिंगणे अपक्ष आमदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून सलग निवडून आले.२०१४ च्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून ते लढले नाहीत.२०१९ मध्ये ते पुन्हा आमदार झाले. सिंदखेडराजा मतदारसंघात आताही शिंगणे साहेबांचेच वर्चस्व आहे. यंदाची निवडणूक ही त्यांच्याच केंद्रीय भोवती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच्या फुटी नंतर ते शरद पवार साहेबांसोबतच राहतील असं वाटत होतं परंतु मात्र अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेला ३०० कोटीचं सॉफ्ट लोन या अटीवर शिंगणे अजित पगार गटात गेले. परंतु आता पुन्हा शरद पवार गटात गेल्यानंतर अजित दादांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यातील महाविकास आघाडी साठी ही आनंदाची बातमी आहे.