Buldhana news : जानेफळ येथील पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण झालेल्या युवकाची हत्या.

buldhana news
Buldhana news

 

 

Buldhana news : पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून पती दिलीप इंगळे यांचे अपहरण केल्याची फिर्याद पत्नी ज्योती इंगळे यांनी मेहकर पोलिस स्टेशनला दिली होती. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाचा तब्बल १८ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत नगर जिल्ह्यात कर्जतनजीक मृतदेह ७ जुलै रोजी आढळला आहे.दिलीप भिकाजी इंगळे असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी जानेफळ (janefal) येथील दोन, तर सातारा व पुणे जिल्ह्यातील तीन अशा एकूण पाच आरोपींना अटक केली आहे.

 

 

यापैकी दोघांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.जानेफळ येथील ज्योती दिलीप इंगळे यांनी जानेफळ पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत अमोल जयसिंग राजपूत व इतरांनी माझे पती दिलीप भिकाजी इंगळे याला पैशाचा पाऊस पाडण्याच्या कामासाठी दि. २२ जून रोजी घरून नेले होते. तसेच रात्री कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. नगर येथून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे म्हटले होते. या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी दि. ९ जुलै रोजी गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, कर्जत तालुक्यातील राशीनजवळील वायसे वाडी परिसरात रस्त्याच्या कडेला एका युवकाचा मृतदेह ७ जुलै रोजी आढळला होता.

 

 

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून ओळख पटविली असता तो मृतदेह दिलीप इंगळे यांचा असल्याचे १० जुलै रोजी समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ जुल रोजी आरोपी संदीप ऊर्फ बाबूराव सुभाष शेवाळे (२४, रा. जानेफळ, ता मेहकर), योगेश रमेश तोंडे (२८, रा जानेफळ, ता. मेहकर) व बाहेर जिल्ह्यातील तीनजण असे एकूण पाचजणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी संदीप सुभाष शेवाळे व योगेश रमेश तोंडे यांना गुरुवार, दि. १० जुलै रोजी मेहकर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली तपासादरम्यान अपहरण करण्यात आलेल्या पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील दिलीप भिकाजी इंगळे यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.