buldhana news | चक्क..युवतीकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

buldhana news
buldhana news

 

 

buldhana news : बुलढाणा जिल्ह्यातील  संग्रामपूर तालुक्यातील एक धक्का देणारी गोष्ट घडलेली आहे. एका २४ वर्षीय युवतीने गावातीलच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना १८ ते २८ मे दरम्यान घडली. याप्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात ३० मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली.अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना २४ वर्षीय युवती तिच्या घरात गेली. घराचा दरवाजा बंद करून पीडित मुलीला कपडे काढायला सांगितले.

 

 

मात्र, अल्पवयीन मुलीने कपडे काढण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी युवतीने जिवे मारण्याची धमकी देत पीडितेला अर्धनग्न केले. तसेच भ्रमणध्वनीमध्ये पीडितेचे फोटो काढले. त्यानंतर आरोपी युवतीने अल्पवयीन मुलीसोबत नको ते चाळे करायला सुरुवात केली. पीडितेने आरडाओरड करताच आरोपी युवतीने घरातून पळ काढला. आरोपी युवती इथेच थांबली नाही. तिने इंस्टाग्राम या समाज माध्यमावर बनावट नावाने अकाऊंट तयार करून अल्पवयीन मुलीचे फोटो अपलोड केले.

 

 

युवतीने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याशी पुरुषी रुषी लगट करत विनयभंग केल्याची ही पहिलीच घटना buldhana news  संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी युवतीवर कलम ४५२, ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब), ३४२, ५०६, भादंविसह आर डब्ल्यू ८, १२, १४ पोक्सो, आरडब्ल्यू ६७ माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.