buldhana news : जिल्ह्यामध्ये गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.अशीच एक घटना घडली आहे.अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याची घटना ३० मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहरापासून १० किमी अंतरावरील सिंदखेडराजा, ते किनगाव राजा रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन किनगाव राजा पोलिसांसह, वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनास्थळाच्या जवळच राहणारी एक महिला सकाळी ७ वाजता लघुशंकेसाठी गेली असता त्यांना ही घटना लक्षात आली. भेदरलेल्या महिलेने परिसरातील लोकांना याची माहिती दिली. पोलिसांना कळविण्यात आले त्यानंतर पोलिसांनी परिसर सील करून प्राथमिक तपास केला व मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपास म्हणून येथे श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनादेखील पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, महिलेची गळा चिरून हत्या केल्याचे पोलीसांच्या पंचनाम्यात समोर आले आहे.
महिला अविवाहित | buldhana news
गळ्ळ्यात मंगळसूत्र किवा अन्य काही नसल्याने सदर महिला अविवाहित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेचा तपास लागावा यासाठी परिसरातील मुख्य रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही पोलिस तपासणार आहेत तर जवळच्या जिल्ह्यात महिला बेपत्ता असल्याचे प्रकरणाची माहिती घेतली जाणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद नरवडे हे करीत आहेत.
मृत महिलेच्या अंगावर आढळल्या जखमा. | buldhana news
असून, पोटावरदेखील जखम दिसून आली. दरम्यान, महिलेच्या चेहऱ्यावर जळालेला कापड टाकण्यात आला आहे. तिच्या अंगावर काळ्या रंगाचा जळालेला परकर, अर्धवट जळालेला गाऊन होता. तिच्या डाव्या पायाच्या पंजाची बोटे तुटलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.