
bns act : ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान, फौजदारी faujdari क्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा १ जुलैपासून इतिहासजमा होणार आहे. या दिवसापासून नवीन कायदे लागू होणार आहेत. खुनाचे कलम आता ३०२ नव्हे तर १०३ असणार आहे. याशिवाय इतरही विविध स्वरूपातील कलमांमध्येही बदल होणार असून तो प्रत्येकास माहीत असणे आवश्यक आहे. भारतीय दंड संहिता, (आयपीसी- १८६०), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी-१८८२) आणि भारतीय पुरावा कायदा (१८७२) हे तीन कायदे देशावर ब्रिटिशांचे राज्य असताना तयार झाले होते. तेव्हापासून हे कायदे बदलण्यात आले नव्हते.
देशाला स्वातंत्र्य मिळूनही ‘इंग्लंडमधील कायद्यानुसारच’ भारतात काम सुरू होते. त्यामुळेच हर मॅजेस्टी, लंडन गॅझेट, ब्रिटिश क्राऊन, बॅरिस्टर यासारख्या संद्यांचाच वापर केला जायचा. दरम्यान, केंद्र शासनाने गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात सुधारित विधेयक सादर करून ते मंजूर करून घेतले. त्यानुसार, १८६० ते १८७२यादरम्यानच्या ब्रिटिश राजवटीत तयार झालेले जुने कायदे बदलून आता भारतीय न्याय संहिता २०२३, नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय सक्षम अधिनियम २०२३ हे तीन कायदे अमलात येणार आहेत. कायद्यातील कलमांमध्येही बदल होणार असून १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
आजपासून कायद्यात असा असेल बदल
गुन्ह्याचा प्रकार सध्याच्या कायद्यानुसार नवीन
खून ३०२ १०३ [१]
खुनी हल्ला ३०७ १०९
गंभीर दुखापत ३२६ ११८ [२]
मारहाण ३२३ ११५
शांतता भंग ५०४ ३५२
विनयभंग ३५४ ७४
धमकी देणे ५०६ ३५१ [२] [३]
चोरी ३८० ३०५ [अ]
दरोडा ३९५ ३१० [२]
विवाहितेचा छळ ४९८ [अ ] ८५
बलात्कार ३७६ [ १ ] ६४ [१]
सरकारी कामात अडथळा ३५३ १३२
अपहरण ३६३ १३७ [२]
फसवणूक ४२० ३१८