buldhana : कारने दिली दुचाकीला धडक ; तब्बल ५ किलोमीटर दुचाकी नेली फरफटत !

buldhana

buldhana : भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघे जण बाजूला फेकल्या गेल्याने जखमी झाले. परंतू दुचाकी कारखाली दाबल्याने त्याच अवस्थेत कारचालकाने दुचाकीला तब्बल पाच किमी फरफटत नेल्याची घटना बुलढाणा-देऊळघाट buldhana-deulghat मार्गावर २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

 

 

 

 

दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी कार व दुचाकी जप्त केली आहे. परंतू अद्याप चालकाविरोधात कोणी तक्रार न दिल्याने अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी २६ सप्टेंबर रोजी दिली. शुभम बादलसिंह कवाळ (२३) आणि बाबूसिंह ताजी (४०) हे दोघे सायंकाळी इजलापूरकडे दुचाकीने जात असतांना देऊळघाटच्या पेट्रोलपंपाजवळ अजिंठ्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. त्यात शुभम आमि बाबूसिंग हे बाजूला फेकल्या गेले आमि दुचाकी कारच्या खाली दबली. दरम्यान कारचा चालकही या अपघातामुळे घाबरल्यामुळे त्यानेही तशाच अवस्थेत दुचाकी सुमारे पाच किमी फरफटत नेली बुलढाणा शहरानजीकच्या धाड नाक्याजवळ असलेल्या ‘शेरीवेलनजीक’ पर्यंत कारने या दुचाकीला फरफटत आणले होते.

 

 

 

युवकांनी केला पाठलाग देऊळघाट येथील काही युवकांनी कारचा पाठलाग केला. ते चालकाच्या लक्षात आल्याने त्याने या मार्गावरच एका हॉटेलजवळ कार उभी केली. घटनेची माहिती बुलढाणा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी एक पथक पाठवून कार चालकाला ताब्यात घेतले. या दुर्घटनेत दुचाकी चालक शुभम कवाळ याला किराकेळ मार लागला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी कार व दुचाकी ताब्यात घेतली. तक्रार न आल्याने कार चालक नितेश खरात (३४, रा. गणेशपूर, ता खामगाव) विरोधात गुन्हा दाखल नाही.