
वरोडी / प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी गेल्या मार्चमध्ये उद्घाटन केलेल्या वरुडी ते मोहदरी दरम्यानच्या शेत रस्त्याचे खडीकरण कामास काल प्रारंभ झाला आहे. सरपंच पती तथा ग्रामपंचायत सदस्य सुधाकरराव गारोळे यांनी पूजन करून आणि नारळ फोडून कामास सुरुवात केली.
मा. सदस्य एकनाथ खरात यांनी मा.डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनात सतत पाठपुरावा करून हे काम मिळवले आहे. या पूजनास गावातील मनोहर गारोळे, नितीन गारोळे, एकनाथ खरात, गजानन गारोळे, काशिनाथ गारोळे, व इतरही मंडळीची हजेरी होती. सर्व गावकरी मंडळींनी मा.आ. डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांचे आभार व्यक्त केले.