buldhana : अवैध दारू तस्कर आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड !

 

buldhana

 

 

 

buldhana : अवैध दारू आणि जुगार यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली, दारूने अनेकांचे जीव घेतले. तर अशाच एका ठिकाणी अवैध दारू तस्कर आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांची कार्यवाही  सिंदखेडराजा sindkhed raja व किनगाव राजा kingaon raja पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करत पोलीसांनी ‘अवैधदारू विक्री व जुगार’ अड्डड्यावर धाड टाकली. या दोन कारवाईत एकुण २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे आदेशाने ५ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन सिंदखेड राजा व किनगाव राजा हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

 

 

 

किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत निमगाव वायाळ nimgaon wayal येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री अड्डड्यावर पोलीसांनी धाड टाकली. यावेळी १८ नग देशी दारूच्या शिशा किंमत १२६० रूपये जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. तर, सिंदखेडराजा पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार अड्ड्यावर एलसीबीने धाड टाकून ८ आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.