बुलढाणा प्रतिनिधी
भूमिपुत्रावर काळाचा घाला..!! बुलढाणा तालुक्यातील तालुक्यातील पळसखेड नाईक येथील जवान दीपक दिवाकर बनसोडे (२८) यांना जम्मू- काश्मीरमधील कुपवाडामध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता १६८ मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.बुधवार २५ सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय बुलढाणा (Buldhana) येथून सकाळी ८:०० वाजता त्यांच्या मूळगावी पळसखेड नागो येथे त्यांच्या रथासोबत बाईक रॅली निघणार आहे. १० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
यादुर्दैवी घटनेच्या दुसऱ्या दिवशी बनसोड यांना सुट्टीनिमित्त घरी निघायचे होते. मात्र, त्यापूर्वी जम्मू कश्मीरमधील कुपवाडा येथे त्यांना वीरमरण आले. त्यांच्यावर आज २५ सप्टेंबर रोजी पळसखेड नागो येथे सैनिकी इतमामात अंत्यविधी होणार असून, या दुखःद घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.गेल्या पाच वर्षांपासून जवान दीपक बनसोड सैन्यात कर्तव्यावर होते. अतिशय हालाखीच्या परिस्थितीचा सामना करून त्यांनी आपले अस्तिव निर्माण केले. महार बटालियन फोर्समधून ते देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. बनसोडे यांच्या पश्च्यात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी असा परिवार आहे.
२२ सप्टेंबर हा दिवस त्यांच्या परिवारासाठी काळरुपी उजाडला होता. नेमके घडले असे कि, वीर जवान बनसोडे कर्तव्यावर होते.जम्मूकश्मीर मधील युद्ध भूमीत फेरफटका मारण्यासाठी ते दलाची चार चाकी वाहन घेवून निघाले. कुपवाडा या दहशतवादी क्षेत्रात पोहचले असता ताब्यातील वाहनाचे नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. यामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले.