
deulgaon raja : तालुक्यातील टाखरखेड takharkhed भगिले येथे १५ दिवसांच्या बाळाला सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी देऊळगाव पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच बाळाला स्त्री रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आले आहे. टाकरखेड takharkhed भगिले येथे एका घरासमोरील अंगणात १५ दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे बाळ २ ऑक्टोबर रोजी पहाटे अज्ञात महिलेने टाकून पळ काढला. याविषयी पोलिस पाटील नारायण दहातोंडे यांनी पोलिसांना माहिती दिली.
त्यावरून पोलिसांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन तेथे जमलेल्या लोकांना ते बाळक कोणाचे आहे याबाबत विचारपूस केली असता उपस्थित असलेल्यांचे नसल्याचे समोर आले. पोलिसांनी बाळाला देऊळगाव राजा deulgaon raja येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी स्त्री रुग्णालय ‘जालना’ येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल कलिम देशमुख करीत आहे.