Buldhana : “मी नाग आहे” सर्वांचा बदला घेईल म्हणत वैद्यकीय अधिकारी यांची महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ ; आरोग्य कर्मचाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार.

 

 

 

पुरुषोत्तम बोर्डे/बुलढाणा 

 

एकीकडे शासन महिलांच्या बळकटीसाठी प्रयत्न करत आहे. लाडकी बहीण योजना सुरू केली पण लाडक्या बहिणीला अपमानास्पद वागणूक मिळत आहेत. अशीच घटना देऊळगाव राजा तालुक्यात घडली आहे. देऊळगाव राजा  तालुक्यातील महिला व इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी “वैद्यकीय अधिकारी” आडगांव राजा डॉक्टर डॉ. दत्ता मांन्टे यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार डॉक्टर मांन्टे देऊळगाव राजा (deulgaonraja) हे त्यांचे कार्यक्षेत्र नसून सुद्धा ते देऊळगाव राजा आरोग्य विभागात येऊन  सर्वच कर्मचाऱ्यांना अपमानस्पद वागणूक देतात व तुच्छ भाषा व तसेच महिला कर्मचारी यांना अश्लील भाषा वापरतात. असेही या तक्रारीमध्ये म्हटले आहे.माझी तक्रार का केली …??  “मी नाग आहे” मी सर्वांचा बदला घेईल”. असे म्हणत  महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली असे या तक्रारीत म्हटले आहे.

 

 

 

 

या अगोदरही आरोग्य कर्मचारी यांनी एकत्र येऊन डॉक्टर दत्ता मांन्टे यांच्या विरोधात ०६ मार्च २०२४ रोजी माननीय कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हा डॉक्टर मांन्टे यांची देऊळगाव राजा येथुन उचल बांगडी करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आडगांव राजा येथे नियुक्त केले होते. परंतु आता सुद्धा त्यांच्या वागण्यामध्ये काहीच बदल झाला नाही. या तक्रारीनुसार त्यांनी महिला आरोग्य कर्मचारी देऊळगाव राजा येथे मासिक रिपोर्ट तयार करत असताना काही महिला कर्मचाऱ्यांना हॉलमध्ये येऊन शिवीगाळ केली. “माझी तक्रार का केली..?” मी तुमच्या प्रत्येकाला बघून घेईल..!!  अशी धमकी सुद्धा त्यांनी या कर्मचाऱ्यांना दिली. मी माझाच माणूस वैद्यकीय अधिकारी म्हणून जवळखेड येथे आणला आहे. तेव्हा आता कंत्राटी कर्मचारी व सर्व कर्मचारी कशी काम करतात ते मी बघतोच. “मी‌ नाग आहे” कुणाला सोडणार नाही. तुमच्या सर्वांचा बदला घेईल. असे या तक्रारीमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे व याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा buldhana यांच्याकडे देण्यात आलेली आहे.

 

 

 

आजवर या महिला आपल्या खात्याचे नांव खराब होऊ नये या भीतीपोटी समोर येत नव्हत्या व आपला आपल्याला त्रास अजुनच वाढेल असे या कर्मचाऱ्यांना वाटत होते.यापुढे या महिलांना जो काही त्रास होईल किंवा त्यांच्या सोबत जे काही बरे वाईट होईल यासाठी सर्वस्वी प्रशासन प्रशासन जबाबदार राहील. यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.