देऊळगाव राजा/प्रतिनिधी
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील “जवळखेड” व उंबरखेड ला लागून असलेल्या नाल्याला २५ रोजी झालेल्या पावसामुळे पूर आला होता. व या नाल्याच्या पुरामध्ये चिमुकल्या मुलासह वडील घ नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेला होता. अखेर अकोला जिल्ह्यातील पिंजर या ठिकाणच्या आपत्कालीन पथकाने शोधमोहीम राबवल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी या दोघांचा मृतदेह चिंचोली व गोंधनखेड शिवरात वेगवेगळ्या ठिकाणी सापडला.
सविस्तर वृत्त असे की देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव चिल्लमखा येथील दीपक निकाळजे व त्यांचा मुलगा अथर्व निकाळजे हे दोघे मोटरसायकलवर निघाले होते. दीपक हा आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जवळखेड येथे गेला होता. संध्याकाळी जेवण केल्यानंतर दीपक निकाळजे व चिमुकला अथर्व हे दुचाकीने वापस यायला निघाले होते. दरम्यान २४ सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे जवळखेड(jawalkhed) येथील नाल्याला पूर आलेला होता. या पुराचा अंदाज न घेता दीपक निकाळजे यांनी त्यामधून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दीपक निकाळजे त्यांच्यासोबत चिमुकला या पाण्याच्या प्रवाहामध्ये दुचाकीसह सह वाहून गेले. दोन दिवसापासून बापलेकाचा शोध सुरू होता परंतु शोध लागत नव्हता त्यामुळे सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील आपत्कालीन पथकाला बोलवले.२८ सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजताच्या दरम्यान हे पथक घटनास्थळावर पोहोचले व अखेर त्यांचा शोध सुरू केला १२ किलोमीटर या पथकाने शोधल्यानंतर अखेर अथर्वचा मृतदेह आढळून आला. व त्याच्या २ किलोमीटर अंतरावर दीपक यांचा मृतदेह आढळला.