
बुलढाणा/प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा २०२४ चार बिगुल वाजला आहे.प्रत्येक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी काल जाहीर केली यामध्ये २८८ पैकी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली.या यादीमध्ये बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील तीनही भाजपचे आमदारांना पुन्हा उमेदवारी देऊन संधी देण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जामोद मतदारसंघातुन डॉ. संजय कुटे, खामगावमधून आकाश फुंडकर तर चिखलीतून सौ. श्वेताताई महाले या तिन्ही विद्यमान आमदारांना पुन्हा रींगणात उतरवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या झालेल्या दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी महाराष्ट्रातील एकूण ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील तिन्ही भाजपा आमदार महोदयांना पुनश्च उमेदवारी देण्यात आली आहे.जळगाव जामोद मतदारसंघातुन डॉ.संजय कुटे यांना सलग पाचव्यांदा तर आकाश फुंडकर यांना सलग तिसऱ्यांदा व चिखली मतदारसंघातून श्वेता ताई महाले यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेल्या आहे.