buldhana news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सजा !

buldhana news

buldhana news : अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर सुरत surat येथे १५ दिवस बलात्कार केल्याप्रकरणी बुलढाणा buldhana येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. मेहरे r.n mehre यांनी एकास २० वर्षे कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली., सुनावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेपैकी पाच हजार रुपये पीडितेला देण्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे देऊळगाव राजा deulgaon raja पोलिस ठाण्यात या प्रकरणी मार्च २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

एका अल्पवयीन मुलीस तालुक्यातील एका गावातील ‘मनोज डोंगरे’ manij dongre (२३) याने सुरत येथे नेले होते. तेथे अडीच महिने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी देऊळगाव राजा deulgaon raja पोलिसांत तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणात काही कलमांची वाढही करण्यात आली होती. या प्रकरणात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी ४ मार्च २०१९ रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास करून या प्रकरणात आरोपी व अल्पवयीन मुलीस परत आणले होते. या प्रकरणी पीडितेच्या जबाबावरून आरोपी मनोज डोंगरेविरोधात गुन्हा दाखल करून प्रकरण न्याय प्रविष्ठ केले होते.

 

 

 

नऊ जणांच्या साक्षी महत्त्वपूर्ण

विशेष न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकार पक्षाचे जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडिता, पीडितेचे आईवडील, जप्तीपंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मांटे vaishali mante व तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी रासायनिक प्रयोगशाळेतून प्राप्त झालेला अहवालही महत्त्वाचा ठरला. प्रकरणात दाखल विविध कलमांनुसार आरोपीस वेगवेगळ्ळ्या शिक्षा व एकूण सात हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या सर्व शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक उमेश बालाजी भोसले व प्रमोद भातनाते यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील साळवे यांनी काम पाहिले.