उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेने केली तोडफोड.

 

 

मुंबई/प्रतिनिधी 

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेने गुरुवारी सायंकाळी कार्यालयात घुसून तोडफोड करत मंत्रालयामध्ये गोंधळ घातला. या प्रकारामुळे मंत्रालयात (mantralay) गोंधळ उडाला आहे. ही महिला मंत्रालयामध्ये घुसली तेव्हा कुठल्याही प्रकारची पास काढलेली नव्हती. पास न करताच महिलेने मंत्रालयामध्ये प्रवेश केला. मंत्रालयामध्ये प्रवेश करतात या महिलेने आपला मोर्चा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे वळविला.

 

 

 

सविस्तर वृत्त असे की गुरुवारी सायंकाळी मुंबईमध्ये पाऊस सुरू होता याचघाई मध्ये मंत्रालयातील सर्वजण आपापल्या घरी जाण्याच्या घाई मध्ये होते. याच वेळेत महिलेला संधी मिळाली व गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान ही महिला मंत्रालयातील सचिवांसाठी असलेल्या गेटमधून या महिलेने मंत्रालयाच्या आवारामध्ये प्रवेश केला. मंत्रालयाच्या बिल्डिंग मधील सहाव्या मजल्यावर असलेल्या  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे प्रवेश करत या महिलेने थेट कार्यालयात प्रवेश करून कार्यालयाला लावलेली असलेली पाटी काढून फेकून दिली.