हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Buldhana Accident News: चिखली-खामगाव रोडवर कार उलटली, १७ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

On: January 11, 2026 7:59 AM
Follow Us:
buldhana accident news कार उलटली १७ वर्षीय विद्यार्थी मृत्यू
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

दिनांक: ११ जानेवारी २०२६  |  ठिकाण: चिखली, बुलढाणा जिल्हा

Buldhana Accident News : चिखली-खामगाव रोडवरील शेलुद ते शिंदिहराळी फाटा दरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दहावीतील १७ वर्षीय विद्यार्थी रितेश लहाने याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास घडली.

ट्युशन संपल्यानंतर मित्रांच्या घरी कार आणून फिरण्यासाठी गेलेले रितेश लहाने, काळे, महाडिक आणि उमाळकर हे चौघे शेलुद येथील शिक्षक कॉलनीतून चिखली-खामगाव रोडने शिंदिहराळी फाट्याकडे जात होते. परत येताना अचानक कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात उतरून एक-दोन पलट्या घेतल्याने हा अपघात झाला.

या अपघातात रितेश समाधान लहाने (वय १७, रा. काटोडा, ता. चिखली) जि.बुलडाणा (buldhana) याचा जागीच मृत्यू झाला तर काळे, महाडिक आणि उमाळकर हे तिघे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कारचा क्रमांक जीजे ०५ सी ९४७९६ आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर रितेशच्या पार्थिवावर काटोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रितेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे लहाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे पण वाचा..

बुलढाणा डाक विभागात मोठी संधी! PLI एजंट व क्षेत्र अधिकारी भरती; २८ जानेवारीला थेट मुलाखत.

हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून परिसरातून रितेशच्या नम्र, आज्ञाधारक व प्रेमळ स्वभावाची चर्चा केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हुसे आणि हवालदार कैलास चतरकर करीत आहेत.

👉 ताज्या स्थानिक आणि बुलढाणा Accident News साठी KattaNews.in नियमित वाचा आणि शेअर करा.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment