buldhana : पोलिसांची कारवाई उत्खनन थांबिवले ; दुसरबीड येथे १ जेसीबी व ११ ट्रॅक्टर जप्त

buldhana

buldhana : सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड dusrbid परिसरात मलकापूर प्रांगा malkapur pangra  रस्त्यालगतच्या गट क्रमंक ६०१ (ईक्लास) जमिनीवर कथितस्तरावर सुरू असलेले उत्खन थांबविण्यात आले आहे. दरम्यान, या ठिकाणाहून महसूलच्या पथकाने ११ ट्रॅक्टर, एक जेसीबी व अन्य एक मशीन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई २४ सप्टेंबर रोजी करण्यात आली. जप्त केलेली वाहनेही किनगाव राजा kingaon raja पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहे. २४ सप्टेंबर रोजी दुपारी महसूल व पोलिस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. जवळपास १ हेक्टर ६० आर जमिनीवर विना परवाना गौण खनिजाचे हे उत्खनन सुरू असल्याची माहिती तहसीलदार अजित दिवटे ajit divte यांना मिळाली.

 

 

 

त्या अनुषंगाने त्यांनी घटनास्थळ गाठून ही कारवाई केली. दरम्यान, कोणाच्या परवानगीने हे ‘उत्खनन’ सुरू होते ही बाब स्पष्ट झालेली नाही. झालेल्या उत्खननाचे मोजमाप करून किती गौणखनिजाचा उपसा करण्यात आला याबाबतही आता महसूल व पोलिस प्रशासनाने कार्यवाही करण्याची गरजआहे. या कारवाई दरम्यान तहसीलदार अजित दिवटे, मंडळ अधिकारी मनसुटे, तलाठी राहूल देशमुख, जी. एस. टेकाळे, रविंद्र लांडगे यांच्यासह दुसरबीडच्या पोलिस पाटील उर्मिला मखमले, संजय आटोळे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

 

 

 

पोलिसांची उशिरापर्यंत कारवाई सुरू

या कारवाई प्रकरणी रात्री उशिरापर्यंत किनगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. होती. त्यामुळे नेमके किती ब्रास अवैध उत्खनन येथे झाली याची स्पष्टता होऊ शकली नाही. प्रकरणात मोठा दंड केला जाऊ शकतो.