सैराट फेम रिंकु राजगुरू आणि बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान चिखली शहरात.

 

 

दहिहंडी उत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.विदर्भातील सर्वात मोठी दहिहंडी उत्सव चिखली या शहरात आ.श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून साजरा होणाऱ्या भाजपा युवा मोर्चा तर्फे आयोजित यावर्षीच्या दहीहंडी उत्सवात विशेष आकर्षण सैराट  चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आणि बॉलीवूड सिने अभिनेत्री झरीन खान यांची उपस्थिती राहणार आहे.

 

 

या दहीहंडीला युवक तसेच माता-भगिनींनी व परिसरातील सर्व नागरिकांनी हजर राहावे अशी विनंती माननीय आमदार श्वेता ताई महाले तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या तर्फे करण्यात आलेली आहे.