हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला! बीबीमध्ये शिक्षकाच्या घरात चोर रंगेहात पकडला

On: March 7, 2026 10:08 AM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथे शिक्षकाच्या घरात चोरी करताना आरोपी पकडला
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

दुसरबिड | ७ मार्च २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथे दिवसा घरफोडीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षकाच्या घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याला घरमालकानेच चतुराईने घरात अडकवून ठेवले आणि पोलिसांना बोलावून रंगेहात पकडून दिले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीबी येथील रहिवासी सुर्यकांत नंदाजी कांगणे हे खापरखेड येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ४ मार्च रोजी सकाळी ते शाळेत गेले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी देखील गहू काढणीसाठी शेतात जाण्यापूर्वी घराला कुलूप लावून गेल्या होत्या.

दरम्यान, दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सुर्यकांत कांगणे व त्यांची पत्नी घरी परतले असता घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. घरात कोणीतरी असल्याचा संशय आल्याने त्यांनी तत्परतेने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची तपासणी केली असता घरात लपून बसलेला आरोपी तेजस सुरेश वैद्य (वय ३०, रा. गणेश नगर, गारखेडा, संभाजीनगर) याला रंगेहात पकडले. आरोपी घरातील कपाट उचकून चोरी करत असल्याचे समोर आले.

फिर्यादी सुर्यकांत कांगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील कपाटातून सुमारे ६ हजार रुपये रोख रक्कम व सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्याचा प्रयत्न आरोपी करत होता. तसेच घरातील काही कागदपत्रे फाडून नुकसान केल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी सुर्यकांत कांगणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(१) व ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


Related News


👉 स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी नियमित भेट द्या Kattanews.in ला.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment