हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहकर पंचायत समितीवर गंभीर आरोप; रोजगार हमी योजनेचे पैसे रखडले, सरपंच दत्ता गवईंचा उपोषणाचा इशारा

On: March 7, 2026 9:07 AM
Follow Us:
मेहकर पंचायत समिती रोजगार हमी योजना मस्टर रखडले सरपंच दत्ता गवई उपोषण इशारा

मेहकर |७ मार्च २०२६

रोजगार हमी योजना अंतर्गत विविध कामांचे डिमांड वेळेत सादर करूनही मजुरांचे मस्टर काढण्यात आले नसल्याने अनेक मजुरांचे पैसे रखडले असून अनेक लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कामे रखडल्याचा गंभीर आरोप करत वडगाव माळी येथील सरपंच दत्ता गवई यांनी प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत योग्य कारवाई न झाल्यास पंचायत समिती मेहकर कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

गट ग्रामपंचायत वडगाव माळी व सावंगी माळी येथील वैयक्तिक विहीर, गुरांचा गोठा, घरकुल यांसारख्या विविध कामांसाठी रोजगार सेवकामार्फत पंचायत समिती मेहकर येथे विहित मुदतीत डिमांड सादर करण्यात आल्याचे सरपंच दत्ता गवई यांनी सांगितले. पंचायत समिती प्रशासनाने संबंधित डिमांड स्वीकारले असले तरी अद्यापपर्यंत मजुरांचे मस्टर काढण्यात आलेले नसल्यामुळे अनेक कामांचे पैसे अडकून पडले आहेत.

या संदर्भात सरपंच दत्ता गवई यांनी स्वतः पंचायत समिती मेहकर कार्यालयात जाऊन चौकशी केली असता संबंधित कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कधी ‘सर्व्हर डाऊन आहे’, कधी ‘गर्दी आहे’, तर कधी ‘डिमांड सापडत नाही, परत द्या’ अशा कारणांमुळे कामाचा विलंब होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सदर कामांचा कालावधी हा सन २०२४-२५ मधील असून त्या कालावधीत डिमांड सादर करूनही आजपर्यंत मस्टर निघाले नसल्याने अनेक मजूर व लाभार्थी अडचणीत आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासकीय कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी तसेच सादर केलेल्या डिमांडनुसार त्वरित मस्टर काढावे, अशी मागणी सरपंच दत्ता गवई यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी आठ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती मेहकर कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.


Related News


हे आवश्यक करा..

 आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा. स्थानिक बातम्या, ब्रेकिंग अपडेट्स आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घ्या.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

Leave a Comment