हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भीमा कोरेगाव शौर्यदिन : महार सैनिकांचा पराक्रम म्हणजे सामाजिक क्रांती – राहुलभाऊ बोंद्रे

On: January 2, 2026 8:16 AM
Follow Us:
भीमा कोरेगाव शौर्यदिन 2026 चिखली येथे राहुलभाऊ बोंद्रे शौर्य अभिवादन
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली प्रतिनिधी/विशाल गवई 

भीमा कोरेगाव शौर्यदिन हा केवळ ऐतिहासिक स्मृतीदिन नसून समता, बंधुता आणि न्यायाची प्रेरणा देणारा दिवस आहे. भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या निमित्ताने महार सैनिकांनी पेशव्यांच्या अन्यायकारक वर्णव्यवस्थेविरोधात दिलेला लढा हा सामाजिक क्रांतीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले. भीमा कोरेगाव शौर्यदिन नव्या पिढीला आत्मसन्मान आणि संघर्षाची दिशा देतो, असेही त्यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या उभारणीस २०८ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा काँग्रेसच्या वतीने अशोक वाटिका जयस्तंभ चौक, चिखली येथे शौर्य अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता धम्मवंदना आणि महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर महार रेजिमेंटच्या शौर्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी विजयस्तंभास अभिवादन करत ऐतिहासिक लढ्याच्या स्मृती जागविल्या.

राहुलभाऊ बोंद्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भीमा कोरेगावचा लढा हा इंग्रज विरुद्ध पेशवे एवढाच मर्यादित नसून बहुजन समाजाच्या स्वाभिमानासाठी दिलेला लढा आहे. आजही संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव ठेवून वैचारिक लढा लढणे गरजेचे आहे.

हे पण वाचा..

पिंप्री गवळीत काळजाला चटका! घरातच १५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.

या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, माजी सैनिक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शौर्यगाथा व मार्गदर्शन कार्यक्रमातून उपस्थितांना सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.

दरम्यान, अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली. प्रत्यक्ष भीमा कोरेगाव येथे जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

📢 तुमचे मत नोंदवा

भीमा कोरेगाव शौर्यदिनाबाबत तुमचे विचार आम्हाला कमेंटद्वारे कळवा. अशाच सामाजिक व राजकीय बातम्यांसाठी KattaNews.in ला फॉलो करा.

📰 संबंधित बातम्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment