ATM robbery news : अज्ञात चोरट्यांनी शेलापूर shelapur येथील स्टेट बँकेचे state bank एटीएम मशीन गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न केला. ही घटना १७ जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. यावेळी ग्रामस्थ येण्यापूर्वी चोरट्यांना चाहूल लागल्याने चोरटे पसार झाले. त्यामुळे चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शेलापूर shelapur येथे ‘मोताळा ते मलकापूर’ मार्गाला लागूनच एटीएम आहे. या एटीएममध्ये १७ जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून एटीएममध्ये प्रवेश केला त्यानंतर चोरट्याने छत्री उघडली आणि सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलरचा स्प्रे मारला. त्यानंतर एटीएम मशीन गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न केला. कॅमेऱ्यावर कलरचा स्प्रे मारल्यामुळे दिल्ली येथे एटीएमच्या सुरक्षेवर असलेली सुरक्षा टीम अलर्ट झाली आणी त्यांनी तत्काळ बँकेचे शाखा व्यवस्थापक यांच्याशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली. शाखा व्यवस्थापक यांनी बोराखेडी borakhedi पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच बोराखेडी ठाणेदार सारंग नवलकार sarang navlkar यांनी स्थानिक नागरिकांशी संपर्क साधून घटनास्थळी पोहोचण्याचे सांगितले आणि लगेच ठाणेदार नवलकार यांनी आपल्या सहकाऱ्यासह शेलापूर गाठले; परंतु स्थानिक नागरिकांची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. दरम्यान, चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. याप्रकरणी शिपाई नीलेश दिनकर सोनोने यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रामदास गायकवाड करीत आहेत.