
crime : पनवेलमधील panvel आदिवासी पाड्यामध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात बलात्कारासह ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यापैकी एका तरुणाला अटक केली आहे. पीडितीला कातकरीवाडी येथील जंगलामध्ये भेटण्यासाठी बोलावून घेतले होते.
त्यानंतर आरोपीने पीडितेला मारण्याची धमकी देऊन ३ ते ४ वेळा लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर गत मे व जून या महिन्यांमध्ये आणखी एका तरुणाने देखील याच पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा ‘अत्याचार’ केले होते. गत आठवड्यामध्ये पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. त्यानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिच्याकडे चौकशी केली असता, तिच्यावर करण आणि दिवेश वाघे या दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली.