Advertisement
वाशिम |३ एप्रिल २०२६
अडोळी गावातील शेतकरी आंदोलन, कर्जमाफी आणि पीक विमा या प्रमुख मागण्यांसाठी आता उग्र रूप धारण करत आहे. अडोळी गावातील शेतकरी दि. २ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करत असून, “गाव विकत घ्या आणि आम्हाला कर्जमुक्त करा” अशी धक्कादायक मागणी त्यांनी सरकारसमोर ठेवली आहे.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये सरसकट कर्जमाफी, वाशीम जिल्ह्यासाठी पीक विमा लागू करणे, खाजगी फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवणे तसेच एमआयडीसी प्रकल्प उभारणे यांचा समावेश आहे. या सर्व मागण्यांसाठी शेतकरी ठाम असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या ठिय्या आंदोलनात युवा शेतकरी सतीश इढोळे, उपसरपंच भगवान इढोळे, परमेश्वर इढोळे, समाजसेवक राजकुमार पडघान, रामदास इढोळे, हनुमान इढोळे, नारायण इढोळे, प्रल्हाद खंडारे, माधव कोंडे, वामन पडघान, गणेश इढोळे, राजेंद्र खोलगाडे, राजू इढोळे, अर्जुना खंडारे, ज्ञानेश्वर इढोळे, गजानन इढोळे, अमोल खंडारे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.दरम्यान, भारतीय कृषी पीक विमा योजनेचे प्रतिनिधी नवनाथ मगरे आणि नितीन घुगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी आक्रमक भूमिकेतच आहेत.अडोळी गावातील हे आंदोलन आता संपूर्ण वाशीम जिल्ह्यासाठी लक्षवेधी ठरत असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
👉 अशाच ताज्या अपडेटसाठी Kattanews.in ला भेट द्या आणि आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.