सिंदखेडराजा प्रतिनिधी/रामदास कहाळे
ग्रामस्थांचा संताप प्रचंड वाढला आहे. आडगाव राजा नेटवर्क समस्या मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असूनऑनलाइन शिक्षण, बँकिंग, सरकारी योजना अर्ज, आरोग्य सेवा सर्वच कामांवर परिणाम झाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे आडगाव राजा नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देत 7 दिवसांची डेडलाइन दिली आहे.
या वाढत्या नाराजीमुळे आडगाव राजा नेटवर्क समस्या आता मोठ्या जनआंदोलनाचे रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आडगाव राजा गावात BSNL आणि Airtel यांच्या उंच टॉवर असतानाही नेटवर्क जवळपास पूर्ण बंद आहे.
दिवसातून अनेक वेळा सिग्नल गायब होतो, कॉल लागत नाहीत, इंटरनेटचा वेग शून्य असतो.
यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, शेतकऱ्यांचे पोर्टलवरील काम, व्यावसायिक व्यवहार, रुग्णांचे आपत्कालीन संपर्क — सर्वच ठप्प झाले आहेत.
रामदास मानसिंग कहाळे आणि अतिष बाबासाहेब राजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसीलदार सिंदखेड राजा यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे —
“टॉवर असूनही नेटवर्क नसणे म्हणजे जनतेचा अपमान आहे. डिजिटल इंडिया चे स्वप्न धुळीस मिळाले आहे.”
“7 दिवसात सेवा नाही तर टॉवरवर चढून आंदोलन”
ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की,
“जर 7 दिवसांत नेटवर्क सेवा सुस्थितीत सुरू झाली नाही, तर आम्ही टॉवरवर चढून तीव्र आंदोलन करू. त्याची जबाबदारी BSNL, Airtel व प्रशासनाची असेल.”
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे — BSNL चा टॉवर उभा करून महिनो झाले असले तरी आजतागायत नेटवर्क सुरूच केलेले नाही.
यावर ग्रामीण भागातील युवक, व्यावसायिक आणि शेतकरी प्रचंड संतप्त आहेत.
हे पण वाचा..
आडगाव राजा गावातील ही नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कितपत गंभीर पावले उचलते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ग्रामस्थांनी दिलेला 7 दिवसांचा अल्टिमेटम आता प्रशासनासाठी मोठी कसोटी बनला आहे
➡ हे आवश्यक करा.
👉 आडगाव राजा नेटवर्क अपडेट्ससाठी KattaNews.in वर दररोज भेट द्या.
👉 तुमच्या भागातील नेटवर्क असल्यास आम्हाला मेल करा: news@kattanews.in
📌 Related News










