हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वाकद शिवार ते धोडप रस्त्यापर्यंत पांदण रस्ता मंजूर करा – लखनसिंह ठाकूर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

On: January 9, 2026 1:41 PM
Follow Us:
वाकद शिवार ते धोडप रस्त्यापर्यंत पांदण रस्ता मंजुरीसाठी लखनसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली मागणी

वाशिम | प्रतिनिधी : नारायणराव आरू पाटील

वाकद शिवार ते धोडप रस्त्यापर्यंत पांदण रस्ता मंजूर व्हावा, या मागणीसाठी भाजपाचे लखनसिंह ठाकूर यांनी वाशिम जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांच्याकडे निवेदन दिले आहे. रिसोड तालुक्यातील वाकद शिवारातील शेतकरी बांधवांसाठी पांदण रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, शेतीची कामे व बाजारपेठेत माल नेण्यासाठी हा रस्ता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रिसोड तालुक्यातील मौजे वाकद शिवारातील शेतकरी बांधवांना पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी तसेच शेतीमधील उत्पादन घरापर्यंत व बाजारपेठेत नेण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पांदण रस्ता योजनामातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्ता योजना कार्यान्वित केल्या आहेत.या योजनांचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांना कोणतीही वाहतुकीची अडचण निर्माण होऊ नये यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाकद शिवार ते धोडप शिवार या पांदण रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

या पार्श्वभूमीवर, भाजपाचे नेते लखनसिंह ठाकूर यांनी दिनांक ७ नोव्हेंबर २०१८ रोजी वाशिम जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्या सह्यांसह निवेदन सादर केले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा देखील करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. अर्पितसिंह चौहान व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच पांदण रस्त्याला मंजुरी देण्याचे आश्वासन लखनसिंह ठाकूर यांना दिले आहे. त्यामुळे वाकद व धोडप परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


📌 शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता का महत्त्वाचा?

  • शेती कामांसाठी थेट शेतापर्यंत वाहतूक सुलभ
  • शेतीमाल घरापर्यंत व बाजारपेठेत नेणे सोपे
  • वेळ, खर्च व श्रमांची बचत
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत

🔔 शेतकरी प्रश्नांसाठी Kattanews.in सोबत रहा

आपल्या गावातील शेतकरी प्रश्न, विकास कामे व प्रशासनाशी संबंधित बातम्या सर्वात आधी व विश्वासार्ह पद्धतीने वाचण्यासाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.


📰 हे पण वाचा..


वाकद शिवार ते धोडप रस्त्यापर्यंत पांदण रस्ता मंजुरी मागणी लखनसिंह ठाकूर वाशिम जिल्हा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment