हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

नांदुरा: काळी पिवळी उलटून १३ प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर

On: January 7, 2026 8:02 AM
Follow Us:
नांदुरा काळी पिवळी उलटून अपघात

नांदुरा प्रतिनिधी/कट्टा न्यूज नेटवर्क 

नांदुरा : जळगाव जामोद ते नांदुर्यात येणारी काळी पिवळी उलटून अपघात सोमवारी सायंकाळी निमगाव फाट्याजवळ घडला. या अपघातात गाडीतील १३ प्रवासी गंभीर जखमी झाले. काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले.

एम एच २८ एम ३०८६ या क्रमांकाची काळी पिवळी गाडी जळगाव जामोद येथून नांदुर्याकडे येत असताना चालकाचे स्टेअरिंग नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. अपघातात प्रवासी महेंद्र वानखडे (१७, अकोली), शाहीस्ता महमुद खान (२०, सुरत), फरीदा महमुद खान (४०, सुरत), अमान महमुद खान (१०, सुरत), अक्षरा संतोष तेलंग (७, पिं. राजा), अन्नपूर्णा संतोष तेलंग (३८, पिं. राजा), अंजना अशोक तायडे (६७, नांदुरा), संतोष रुस्तम तेलंग (४५, पिं. राजा), अशोक निनाजी तायडे (७२, नांदुरा), शबनम पठाण महमुद पठाण (२०, सुरत), महमुदखान बिस्मिल्लाह खान (५३, सुरत), भुसरा खान महमुद खान (१६, सुरत) आणि शाहीन जाकीर देशमुख (२४, सुरत) यांचा समावेश आहे.

हे पण वाचा..

देवदर्शनासाठी निघाले, पण परतले नाहीत! अपघातात आतेभाऊ व मामेबहीण ठार.

जखमींना तातडीने नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले. गंभीर प्रकृती असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी खामगाव हलविण्यात आले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी त्वरित पोहचून तपास सुरु केला आहे.

तुरंत अधिक माहिती मिळवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment