हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

३३ वर्षांचा शिक्षणयज्ञ पूर्ण! चालते-बोलते विद्यालय प्राचार्य अशोकराव काळुसे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त

On: January 5, 2026 9:04 AM
Follow Us:
३३ वर्षांचा शिक्षणप्रवास पूर्ण करणारे प्राचार्य अशोकराव काळुसे सेवानिवृत्त

सिंदखेडराजा/समाधान सरकटे 

३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्य अशोकराव काळुसे सेवानिवृत्त झाले असून शिक्षण क्षेत्रात हा क्षण भावनिक ठरला आहे. प्राचार्य अशोकराव काळुसे सेवानिवृत्त  झाल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा एक युगप्रवास पूर्ण झाला. प्राचार्य अशोकराव काळुसे सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी दिलेले संस्कार आयुष्यभर प्रेरणा देणारे ठरणार आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोक बाबुराव काळुसे यांनी प्राथमिक शिक्षण दरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण सिंदखेडराजा व मेरा बु. येथील शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. पुढे स्वामी विवेकानंद आश्रमातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करत त्यांनी चिखली येथील शिवाजी हायस्कूलमधून पदवी घेतली.संभाजीनगर येथून बी.एड. पदवी प्राप्त करून १९९३ साली औंढरेश्वर विद्यालय, अंढेरा येथे शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर १९९४ मध्ये भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ, रुम्हणा अंतर्गत शिक्षक पदावर रुजू झाले. विनाअनुदानित शाळेत सहा वर्षे कठोर परिश्रम करत शासन मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्यावर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

शिक्षक, मुख्याध्यापक ते प्राचार्य असा ३३ वर्षांचा प्रवास करत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडवले. महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पास्टा (ता. व जि. जालना) येथे प्रदीर्घ सेवा बजावत ते ३१ डिसेंबर २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

हे पण वाचा…

अखेर कारवाई! शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित — महिलांशी गैरवर्तन व धमकी प्रकरण.

“शाळा हे मंदिर, विद्यार्थी हे दैवत, अध्यापन ही उपासना” या मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून त्यांनी शिक्षणाला केवळ नोकरी न मानता समाजघडणीचे साधन बनवले. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगासाठी सक्षम करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले.

शिक्षक कधीच निवृत्त होत नाहीत— कारण त्यांनी दिलेले संस्कार पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. प्राचार्य अशोकराव काळुसे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

👉 शिक्षण क्षेत्रातील अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी

Kattanews.in ला आजच Follow करा

हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

Leave a Comment