हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अखेर कारवाई! शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित — महिलांशी गैरवर्तन व धमकी प्रकरण

On: January 3, 2026 7:13 PM
Follow Us:
शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित प्रकरण
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

समाधान सरकटे/साखरखेर्डा

शिंदी येथील ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित करण्यात आल्याने ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदी ग्रामसेवक निलंबित करण्याची मागणी महिलांशी गैरवर्तन, धमकी आणि मनमानी कारभाराच्या गंभीर तक्रारींनंतर जोर धरत होती. अखेर ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित झाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शिंदी ग्रामसेवक निलंबित ही कारवाई जिल्हा परिषद स्तरावरून करण्यात आली आहे.

सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे याला १ जानेवारी रोजी गटविकास अधिकारी सिंदखेडराजा वर्ग-१ अजितकुमार बांगर यांनी निलंबित केले. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य गणेश तुकाराम खरात यांनी ४ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनुसार, ग्रामसेवक दिनकर काळे यांनी शिंदी येथे कार्यरत असताना महिलांशी अपमानास्पद वागणूक, गैरवर्तणूक तसेच मनमानी कारभार करून शासकीय कामकाजात अनियमितता केल्याचा आरोप आहे. याशिवाय ग्रामपंचायतमध्ये आलेल्या महिलांना धमकी देण्याचे प्रकारही समोर आले होते.

या प्रकरणात एका महिलेने व्हॉट्सॲप चॅटिंगच्या कारणावरून संबंधित ग्रामसेवकाला जाब विचारल्याची घटना चर्चेत आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने सरपंचांनी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी गटविकास अधिकारी व १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.

तक्रारींची गंभीर दखल घेत सदर ग्रामसेवकाची तातडीने तांदूळवाडी येथे बदली करण्यात आली होती. मात्र, फोनद्वारे तसेच गावात येऊन “तक्रार केली तर पाहून घेईल” अशी धमकी देत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला.

या सर्व बाबींच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील नियम १९६४ अंतर्गत तसेच विस्तार अधिकारी पंचायत सिंदखेडराजा यांच्या चौकशी अहवालानुसार दिनकर काळे यांना ग्रामपंचायत अधिकारी पदावरून निलंबित करण्यात आले आहे. 

हे पण वाचा..

“बाई मेली तरी मला फरक पडत नाही!” — सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचारावर महिलाचे आमरण उपोषण; झेडपी CEO चा कथित संतापजनक उद्गार

निलंबन काळात संबंधित ग्रामसेवकाला कोणताही व्यवसाय अथवा नोकरी करता येणार नाही. मुख्यालयाबाबतचे स्वतंत्र आदेश जिल्हा परिषद बुलढाणा स्तरावरून निर्गमित होणार असल्याचे आदेशात नमूद आहे.


📌 KattaNews वाचकांसाठी महत्त्वाचे

👉 हे आवश्य करा 

  • ✔️ तुमच्या परिसरातील बातम्या KattaNews.in वर पाठवा
  • ✔️ ग्रामपंचायत, तहसील, जिल्हा परिषद बातम्यांसाठी आमच्याशी जोडा
  • ✔️ ही बातमी Share करून सत्याचा आवाज मजबूत करा

📰 हे पण वाचा..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment