हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अखेर मायेचा विजय! मादी बिबट्या पिलासाठी परतली; पिल्लू घेऊन जंगलात पसार — क्षण कॅमेऱ्यात कैद

On: January 3, 2026 7:06 AM
Follow Us:
मादी बिबट्या पिल्लू घेऊन जंगलात जाताना

हिवरा आश्रम/कट्टा न्यूज नेटवर्क 

मादी बिबट्याच्या पिल्लु आढळून आल्याने या घटनेमुळे दुधा-कळंबेश्वर रोड परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतातील कोठ्यात मादी बिबट्या चे पिल्लू आढळल्याची माहिती मिळताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मात्र अखेर मादी बिबट्या आपल्या पिल्लासाठी परतली आणि मादी बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षितपणे जंगलात घेऊन गेल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ही बाब लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. मादी बिबट्या आपल्या पिल्लासाठी परत येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी ट्रॅप तसेच ट्रॅप कॅमेरे बसवून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले होते.बुधवारी रात्री मादी बिबट्या न आल्याने चिंता वाढली होती. मात्र गुरुवारी रात्री अखेर मादी बिबट्या घटनास्थळी आली. तिने बिबट्याचे पिल्लू तोंडात धरले आणि काही क्षणातच जंगलाच्या दिशेने निघून गेली. हा संपूर्ण थरारक आणि भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.बुधवारी सकाळी मादी बिबट्याने दोन पिल्ले तोंडात धरून नेत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले होते. त्यानंतर शोध घेतला असता एक बिबट्याचे पिल्लू गोठ्यातच आढळून आले होते. सदर पिल्लू सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले होते.हे पण वाचा..

बुलढाण्यात ACB ची मोठी कारवाई! वनविभागाची ACF अश्विनी आपेट लाच घेताना रंगेहात.

या यशस्वी रेस्क्यूमध्ये घाटबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले, वडाळी बिटचे वनरक्षक शिवनारायण पडघान, पाचदेवळा बिटचे वनरक्षक उल्हास भोंडणे, संदीप मडावी तसेच बुलढाणा रेस्क्यू टीमचे प्रवीण सोनवणे व पवन वाघ सहभागी होते.

वनविभागाने नागरिकांना परिसरात सतर्क राहण्याचे व वन्यजीव दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

👉 अशाच भावनिक, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर पंचायत समिती माहिती अधिकार कारणे दाखवा नोटीस

माहिती अधिकाराच्या आदेशाची पायमल्ली? मेहकर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाची कारणे दाखवा नोटीस

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचे पथसंचलन

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; पथसंचलनातून दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

सहकार्य गणेश मंडळ चिखली यांच्या वतीने वृक्षवाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम

सहकार्य गणेश मंडळ चिखलीचा सामाजिक उपक्रम १०१ वृक्षांचे वाटप, २१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

रायपूर भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी

रायपूरच्या भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करा; कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

"श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन"

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

Leave a Comment