हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहकर-लोणारमध्ये उबाठा व काँग्रेसचा डंका; किशोर गारोळे व मीरा मापारी विजयी

On: December 22, 2025 7:30 AM
Follow Us:
मेहकर लोणार नगराध्यक्ष निवडणूक निकाल 2025 उबाठा काँग्रेस विजय

प्रा.दिलीप नाईकवाड/बुलढाणा जिल्हा 

मेहकर-लोणार मतदारसंघात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मेहकर नगराध्यक्ष निवडणूक आणि लोणार नगराध्यक्ष निकाल यामध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. मेहकर नगराध्यक्ष निवडणूक निकालात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किशोर गारोळे यांनी तब्बल ११०० मतांनी विजय मिळवत सत्ता काबीज केली. त्याचबरोबर लोणार नगराध्यक्ष निकाल मध्ये काँग्रेसच्या सौ. मीरा भूषण मापारी यांनी चौरंगी लढतीत बाजी मारली. या निकालामुळे मेहकर-लोणार मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर-लोणार मतदारसंघात उबाठा शिवसेना आणि काँग्रेस पक्षांनी आपली राजकीय ताकद सिद्ध केली असून राज्यात सत्ता असतानाही शिवसेना शिंदे गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मेहकर नगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किशोर गारोळे नगराध्यक्षपदी निवडून आल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही नगरपालिका शिंदे गटाच्या हातातून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे.

लोणार नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या पाहता काँग्रेसचे ९, शिंदे शिवसेनेचे ४, भाजपाचा १, एमआयएमचा १ तर ५ अपक्ष नगरसेवक विजयी झाले आहेत. या निकालामुळे लोणार नगरपालिकेत काँग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले असून आगामी काळात स्थानिक राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

📌 हे पण वाचा..

👉 तुमचं मत नोंदवा

मेहकर-लोणार नगरपालिकेच्या निकालाबाबत तुमचं मत काय? उबाठा आणि काँग्रेसचा हा विजय आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम करेल का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पहिल्याच दिवशी अविरोध निवड

मोठी बातमी! बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे पहिल्याच दिवशी अविरोध विजयी

स्वतंत्र विदर्भासाठी मिशन २०२७ मेळाव्यात ॲड. वामनराव चटप यांचे मार्गदर्शन

स्वतंत्र विदर्भासाठी ‘मिशन २०२७’चा निर्धार! सिंदखेडराजातून ॲड. वामनराव चटप यांचा मोठा इशारा; डिसेंबर २०२७पर्यंत राज्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि NEET वादानंतर शिक्षण व्यवस्थेवरील विशेष संपादकीय

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पण विद्यार्थ्यांचा विश्वास परत कसा मिळणार? NEET वादानंतर शिक्षण व्यवस्थेची खरी परीक्षा

धर्मेंद्र प्रधान राजीनाम्यानंतर अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा! विद्यार्थ्यांचा मोठा विजय, दीपकेंची पहिली प्रतिक्रिया

SIR Form 2026 Maharashtra voter list update process

SIR फॉर्म घरबसल्या 5 मिनिटांत कसा भरायचा? BLO घरी येणार, Part Number शोधण्यापासून स्वाक्षरीपर्यंत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्मशानभूमीच्या प्रश्नावर बोलताना आमदार सिद्धार्थ खरात

स्मशानभूमीच्या प्रश्नावर सभागृहात आमदार सिद्धार्थ खरात आक्रमक; मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा, स्वतंत्र धोरणाची ग्वाही

Leave a Comment