हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

कार्यालयात केक कापला तर थेट कारवाई! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कडक परिपत्रक जारी.

On: December 17, 2025 8:28 PM
Follow Us:
सरकारी कार्यालयात केक कापण्यावर बंदी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

प्रतिभा जगदने/कट्टा न्यूज 

सरकारी कार्यालयात केक कापला तर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे. सरकारी कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करणे किंवा खासगी समारंभ आयोजित करणे हे आता महागात पडू शकते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ अंतर्गत कडक परिपत्रक जारी करत शासकीय शिस्तीचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

अलीकडे अनेक सरकारी कार्यालयांमध्ये वाढदिवस, केक कापणे, फुगे, सेलिब्रेशन असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत शासनाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

परिपत्रकानुसार, शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ साजरे करणे हे नियमबाह्य आहे. कार्यालयीन वेळेत वाढदिवस, सत्कार, केक कापणे किंवा इतर खासगी कार्यक्रम केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार सरकारी कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत पूर्णपणे शासकीय कामकाजावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारचे सेलिब्रेशन केल्यास नोटीस, चौकशी, दंड किंवा निलंबन अशीही कारवाई होऊ शकते.

या परिपत्रकामुळे अतिउत्साही कर्मचाऱ्यांना मोठा दणका बसला असून, शासकीय कार्यालयांमध्ये शिस्त पाळण्याचे निर्देश पुन्हा एकदा ठळक करण्यात आले आहेत.

👉 अशाच महत्त्वाच्या सरकारी निर्णयांच्या बातम्यांसाठी KattaNews.in ला Follow करा

ताज्या ब्रेकिंग न्यूज, सरकारी निर्णय, प्रशासनाच्या हालचाली आणि जनहिताच्या बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सहकार्य गणेश मंडळ चिखली यांच्या वतीने वृक्षवाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम

सहकार्य गणेश मंडळ चिखलीचा सामाजिक उपक्रम १०१ वृक्षांचे वाटप, २१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

रायपूर भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी

रायपूरच्या भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करा; कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

"श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन"

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

चिखली गांजा जप्त कारवाईत बुलढाणा पोलिसांनी जप्त केलेला गांजा आणि अटक करण्यात आलेला आरोपी

चिखलीत २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त; एकाला अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत पोलिसांची कारवाई

फक्त कॉलिंग-SMS रिचार्ज हवाय? TRAI च्या नव्या निर्णयाने मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा

Leave a Comment