हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

झोपेत असतानाच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; अपमानाच्या रागातून उटी बुद्रुक हादरले!

On: December 9, 2025 8:07 AM
Follow Us:
उटी बुद्रुक पत्नीची कुऱ्हाडीने हत्या प्रकरण.

प्रतिभा/जगदने 

 

उटी बुद्रुक येथे घडलेली पत्नीची हत्या ही घटना सर्वांना हादरवणारी ठरली आहे. पतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वाद आणि अपमानाच्या रागातून घडलेल्या या  प्रकरणामुळे गावात शोककळा पसरली असून सात महिन्यांच्या बाळासमोर ही भीषण पत्नीची हत्या झाल्याने समाजमन हेलावून गेले आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक गावात ७ डिसेंबरच्या मध्यरात्री ही निघृण घटना घडली. मृतक लक्ष्मी पवन धुंदाळे (२४) झोपेत असताना तिचा पती पवन गजानन धुंदाळे (२८) याने कुऱ्हाडीचे वार करून तिचा जागीच मृत्यू केला. ‘तू काही कामाचा नाहीस, बाहेर जा आणि मरून जा’ असे पत्नीने सांगितल्यामुळे राग अनावर झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

कृत्य झाल्यानंतर आरोपीचे आई-वडील घाबरून थेट ग्राम पोलिस पाटील संदीप गटमने यांच्या घरी गेले आणि संपूर्ण घटना सांगितली. पोलिस पाटलांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नंतर जळगाव जामोद पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला.लक्ष्मी आणि पवन हे शेतमजूर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे दाम्पत्य होते. त्यांना सात महिन्यांची मुलगी आहे. आईची हत्या आणि वडील पोलिस कोठडीत—या परिस्थितीमुळे त्या चिमुकलीचे भविष्य अंधारात गेले आहे. गावात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.८ डिसेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलिस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्नेहा शेडगे करत आहेत.

📢 ताज्या घडामोडी, स्थानिक अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूजसाठी KattaNews.in ला भेट द्या!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पालकमंत्री बेपत्ता, बुलढाण्यात शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पालकमंत्री बेपत्ता? ‘काजू-बदामाची व्यवस्था शेतकरी करतील, पण बांधावर तरी पाठवा’ बुलढाण्यात पोलिसांत तक्रार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

Leave a Comment