हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अंढेरा फाटा परिसरात पोलीस स्टेशनलगत धाडसी घरफोडी; वनरक्षकाच्या घरातून 2.43 लाखांची चोरी.

On: December 8, 2025 11:55 AM
Follow Us:
अंढेरा फाटा परिसरातील धाडसी घरफोडी आणि 2.43 लाखांची चोरी

शिवहरी मांटे /प्रतिनिधी 

अंढेरा फाटा परिसरात घडलेली ही धाडसी घरफोडी नागरिकांना हादरवणारी ठरली आहे.
पोलीस स्टेशनलगतच चोरी झाल्याने अंढेरा फाटा परिसरात सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षक विष्णू काकड यांच्या घरात ही चोरी झाली असून
अंढेरा फाटा परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
अंढेरा फाटा घरफोडी घटना
अंढेरा फाटा घरफोडी घटना
या धाडसी प्रकारात चोरट्यांनी 2.43 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी 4 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे कामानिमित्त गेले असताना
गावातील राम राठोड यांनी फोन करून त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली.
फिर्यादी घरी परतले असता घराचे पाठीमागील उघडे दार उचकटल्याचे दिसून आले.
घरातील रोख रक्कम व दागदागिने असा एकूण 2,43,000 रुपयांचा माल चोरीस गेला असल्याचे समोर आले.

चोरट्यांनी नेलेला ऐवज पुढील प्रमाणे —
रोख रक्कम ₹1,30,000,
3 तोळे चांदीची चैन (₹5,000),
4 तोळे सोन्याची साखळी (₹1,00,000),
गॅस सिलेंडर आणि भांडी (₹8,000).

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावले.
काही ठसे हस्तगत करण्यात आले असून तपास सुरू आहे.
गावात पोलीस स्टेशन असताना अशा प्रकारची मोठी चोरी होणे हा गंभीर मुद्दा समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे.
“पोलीस स्टेशन जवळ असताना अशी मोठी चोरी होते, तर मग आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा?” असा प्रश्न गावकऱ्यांतून पुढे आला आहे.

देऊळगाव राजा उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली,
ठाणेदार रुपेश शक्करगे व तपास अधिकारी दुय्यम ठाणेदार दिनेश घुगे पुढील तपास करत आहेत.


📢 ताज्या अपडेट्ससाठी KattaNews.in ला Follow करा

नवीन घडामोडी, ब्रेकिंग अपडेट्स आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्या पोर्टलला भेट द्या.


🔗 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पालकमंत्री बेपत्ता, बुलढाण्यात शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पालकमंत्री बेपत्ता? ‘काजू-बदामाची व्यवस्था शेतकरी करतील, पण बांधावर तरी पाठवा’ बुलढाण्यात पोलिसांत तक्रार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

Leave a Comment