चिखली प्रतिनिधी/विशाल गवई
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चिखली पोलिस कारवाई अंतर्गत
9 अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चिखली पोलिस कारवाई निर्णायक ठरली आहे.शहरात शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी
पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलत पुन्हा एकदा चिखली पोलिस कारवाई
दाखवून कडक संदेश दिला आहे.
तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची यादी
- गणेश गंगाराम चौधरी – संभाजीनगर, चिखली
- ऋषिकेश विजय हिवाळे – लुम्बिनी नगर, चिखली
- आनंद गुलाबराव अनपट – आनंद नगर, चिखली
- गोपाल रामा पाईकराव – एकता नगर, चिखली
- मो. परवेज मो. हनिफ – गौरक्षणवाडी, चिखली
- पंकज प्रल्हाद सुरडकर – गजानन नगर, चिखली
- शेख समीर उर्फ बाबा शेख कदीर – भिमनगर, चिखली
- विजय राम गायकवाड – एकता नगर, चिखली
- समाधान उर्फ गोटया तोताराम बोराडे – राऊतवाडी, चिखली
यांच्यावर मारहाण, धमकी, चोरी, अवैध धंदे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंद असून,या गुन्हेगारांच्या उपस्थितीमुळे निवडणूक काळात शहरातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता होती.
अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 3 महिन्यांचा तडीपार
उपविभागीय अधिकारी, चिखली यांनी प्रस्ताव मान्य करत संबंधित गुन्हेगारांना
पुढील 3 महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर — पुणे, जालना, जाफ्राबाद —
या भागात तडीपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.
कारवाईमागील पोलीस यंत्रणेचा समन्वय
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात,
पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
हे पण वाचा.
एमपी रॉयल्टी की फेक? बुलडाणा शहरात अवैध रेती वाहतूकीचा भंडाफोड — तहसीलदारांची पहाटे धडक कारवाई
या पथकात समाधान वडणे, राजेंद्र काळे, विजय किटे, अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावा,
पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन व मपोका रुपाली उगले यांचा समावेश होता.
📢 तुमच्या परिसरातील ताज्या घडामोडी वाचा
👉 ताज्या ब्रेकिंग बातम्या येथे क्लिक करून वाचा
🔎 Related News












