Kingaon raja accident : भरधाव आयशर आणि शिवशाही shivshahi बसची समोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर तर २१ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर नागपूर chhatrapati sambhaji nagar nagpur राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किनगाव राजा kingaon raja गावाजवळ १३ जुलै रोजी रात्री घडली.शिवशाही बस क्रमांक (एमएच ०९, ईएम २१२५) ही छत्रपती संभाजीनगरवरून रिसोडला जात होती. तसेच आयशर क्रमांक (एमएच २०, ईजी ८८११) मेहकरवरून छत्रपती संभाजीनगरला जात होता.
‘किनगाव राजा’ kingaon raja गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपानजीक दोन्ही वाहनांची समारोसमोर धडक होऊन यामध्ये आयशर चालक अरमान एस. शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) व अन्य एकजण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुढी उपचारासाठी जालना येथे दाख करण्यात आले असून, त्यांची प्रकृ चिंताजनक आहे. या अपघातात शिवशाही बसचालक के. टी. देशमुर वाहक जी. एल. नेहवाल यांच्यास प्रवासी जखमी झाले आहेत.
बसमधील २० ते २१ प्रवासी बचावले!
शिवशाही बसमधून एकूण २० ते २१ प्रवासी प्रवास करत होते. सिंदखेड राजाजवळ sindkhed raja नालासोपारा वाशिम nalasopara washim ही बस ब्रेकडाऊन झाली असल्यामुळे या बसमधील ७ ते ८ प्रवासीसुद्धा शिवशाही बसमध्ये होते. सुदैवाने या अपघातात सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विनोद नरवाडे, पोलिस कर्मचारी विष्णू मुंढे, शरद ठोंबरे, शिवाजी बारगजे, मिलिंद सोनपसारे, नाजीम चौधरी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदत करून रुग्णालयात दाखल केले.