राज्यातील सीएचओ गाजविनार मुंबई चे आझाद मैदान ; सीएचओ चे ऑनलाइन कामबंद आंदोलन !

 

सीएचओ

 

 

 

राज्यातील सीएचओ गाजविनार मुंबई चे आझाद मैदान ; सीएचओ चे ऑनलाइन कामबंद आंदोलन !  शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, यासह विविध मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने राज्यातील ८ हजार समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे. १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाइन कामबंद’ करण्यात आले आहे. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर azad maidan लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे.२०१६ पासून उपकेंद्रस्तरावर समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आयुष्मान भारत अभियानात सीएचओ CHO योगदान देत आले आहेत. माता सुरक्षित घर सुरक्षित, जागरूक पालक सुदृढ बालक, नवचैतन्य आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे असे विविध आरोग्य अभियान हे अधिकारी राबवित आले आहेत.

 

 

 

मागील सात ते आठ वर्षांपासून समूदाय आरोग्य अधिकारी आधी तीन वर्षे वैद्यकीय अधिकारी व आता समूदाय आरोग्य अधिकारी म्हणून उपकेंद्र (आयुष्मान आरोग्य मंदिर) येथे सेवा देत आहेत. त्याआधी उपकेंद्रांतर्गत फक्त बाळाचे लसीकरण व गरोदर माता तपासणी या दोनच गोष्टी होत होत्या. परंतु आता ७ ते ८ वर्षांपासून रुग्ण बाह्यरुग्ण सेवा व इतर तेरा प्रकारच्या सेवा समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत दिली जाते. त्यामुळे आता महिन्याला ५०० ते १००० च्या जवळपास ओपीडी OPD शक्य होते. त्यामुळे समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांना शासन सेवेत नियमित करून उपकेंद्र स्तर समुदाय आरोग्य अधिकारी पदाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

 

 

४० दिवसांच्या वेतनाचे काय ?

आरोग्यमंत्री तानाजी सावंत tanaji sawant यांनी मागील राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी आरोग्य कर्मचारी व अधिकारी समायोजन कृती समितीच्या मागण्या मान्य केल्यानंतर संपकाळातील ४० दिवसांचे वेतन कपात होणार नाही, अशी शाश्वती दिली होती. मात्र अद्यापही संपकाळातील वेतन मिळाले नसल्याने सीएचओंनी असंतोष व्यक्त केले आहे.

 बदल्यांचे धोरण राबवावे

सरसकट मानधन देण्यात यावे, २०१६ पासून रुजू झालेल्या सीएचओंची CHO सेवा ज्येष्ठता, पगारवाढ, वेतन सुसूत्रीकरण व अनुभव ग्राह्य धरावा, बदलीचे धोरण राबविण्यात यावे, ईएसआयसी व ईपीएफचा लाभ देण्यात यावा, विमा कवच, फिक्स पीटीए व टीए देण्यात यावा, अशा मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.

डाटा एण्ट्री ऑपरेटरची नेमणूक करा

शहरी भागात पाच हजार, ग्रामीण, दुर्गम भागात ३ हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र असावे, त्यानुसार प्रति ३ ते ५ हजार लोकसंख्येमागे एक सीएचओ नेमावा, ऑफलाइन व ऑनलाइन कामाची विभागणी समप्रमाणात करण्यात यावी किंवा उपकेंद्रामध्ये डाटा एण्ट्री ऑपरेटर देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.