हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
रिसोड नगरपरिषद निवडणुका: शहरातील Security Check नाकाबमेहकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचे राशीभविष्य: तुमच्या राशीसाठी आजचा Lucky Day? धरिसोड नगरपरिषद निवडणूक 2025: नगराध्यक्षपदासाठीजनतेच्या प्रश्नांना थेट उत्तर! आमदार सिद्धार‘समृद्धी’वरील सोन्याची लूट! पोलिसांकडून आरो

सिंदखेडराजा तहसील आवारातून जप्त जेसीबी पळवली! तहसीलदार दिवटे यांचा थरारक पाठलाग — 2 आरोपी अटक|Sindkhed Raja‌‌ JCB Chori

On: November 22, 2025 6:54 AM
Follow Us:
Sindkhed Raja‌‌ JCB Chori

Sindkhed Raja‌‌ JCB Chori : सिंदखेडराजा तहसील आवारातून जप्त जेसीबी पळवण्याची धाडसी घटना उघड झाली आहे. ही जप्त जेसीबी वाळू उत्खननाच्या संशयावरून ताब्यात घेतली होती. आरोपींनी संगनमत करून तहसील कार्यालयाच्या आवारात उभे ठेवलेल्या जप्त जेसीबी ला चोरी (Sindkhed Raja‌‌ JCB Chori) करून नेल्याची तक्रार शिपाई अनंता विठोबा वाठोरे यांनी दाखल केली.
घटनेनंतर तहसीलदार अजित दिवटे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी तात्काळ पाठलाग केला व मेहकर रोडजवळ जेसीबीसह आरोपी पकडला. या जप्त जेसीबी प्रकरणामुळे महसूल व प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी गावात बेकायदेशीर रेती (वाळू) उत्खननाच्या संशयामुळे तहसील कार्यालयाने बिना नंबरची जेसीबी जप्त केली होती. पोलीस आणि तहसील पथकांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही मशीन तहसील आवारात सुरक्षितपणे ठेवली होती.परंतु गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी ताशी 11:30 वाजता दोन आरोपींनी संगनमत करून ही जप्त जेसीबी चोरी (Sindkhed Raja‌‌ JCB Chori) करून नेल्याची घटना घडली. घटना लक्षात येताच तहसीलदार अजित दिवटे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी पाठलाग करून मेहकर रोडजवळ जिजामाता पेट्रोल पंपाजवळ जेसीबीसह चालकाला पकडले.फिर्यादी शिपाई अनंता विठोबा वाठोरे (वय 40) यांनी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादीनुसार आरोपी — समाधान नारायण मोरे व शुशिल प्रभाकर शिंदे (रा. ताडशिवनी) यांनी पूर्वनियोजितपणे हे कृत्य केले असे दाखलात नमूद आहे. तात्काळ गुन्हा नोंदवून (नोंद क्र. कायमी अप क्र. २३२/२५) तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि महसूल विभागानेही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!