विशाल गवई /प्रतिनिधी
खून आरोपी जेरबंद करण्यासाठी बुलढाणा Buldhana LCB ने मोठी कारवाई केली असून या धडाकेबाज ऑपरेशनमध्ये खूनी आरोपी जेरबंद करण्याची १० वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.
२०१६ पासून फरार असलेला आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आल्याने आरोपी जेरबंद केल्याची खात्री पोलिसांनी दिली.या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांत Buldhana LCB पोलिस पथकांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अखेर काल्या शेख जेरबंद करण्यात यश आले.
१० वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणात आरोपी शेख इरफान उर्फ काल्या शेख अशपाक (वय ३३, रा. मिलींदनगर, बुलडाणा) हा २०१६ पासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून आज १९ नोव्हेंबर रोजी पथकाने कारवाई करत त्याला जेरबंद केले.
आरोपीविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १६/२०१६
कलम ३०२, २०१, १२० (ब) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल होता.
दरम्यान, मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी दे. राजा पोलीस स्टेशनच्या अप. क्र. २६९/२०२४ कलम ३०९(६), ३१० BNS मधील फरार अभय दिलीप डोंगर (वय २४, रा. कन्हैयानगर, जालना) यासही जालना शहरातून अटक करण्यात आली.
हे पण वाचा.
धाड परिसर हादरला: २५ वर्षीय महिलेची आत्महत्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
पीआय सुनिल अंबुलकर यांच्या आदेशाने करण्यात आली.
कारवाईत पोउपनि अविनाश जायभाये,
दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, अनंता फरतळे, सुनिल मिसाळ, गणेश वाघ, मनोज खरडे, आशा मोरे
या सर्व पथकाचे योगदान उल्लेखनीय ठरले.













