Chhatrapati shivaji maharaj : लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ london victoria albert museum मधील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज chhatrapati shivaji maharaj यांचीच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी विधानसभेत सांगितले, ही वाघनखे छत्रपती शिवरायांची नाहीत असा दावा करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी विविध अभ्यासक, संशोधक आणि शिवप्रेमींचे दाखले देत सभागृहात निवेदन केले.
या वाधनखांसाठी ब्रिटनमध्ये १८२५ मध्ये बनविलेल्या अफजलखानाच्या afajal khan डबीवरही वधासाठी शिवरायांनी ही ‘वाघनखे’ waghanakhe वापरल्याचा उल्लेख आहे. ब्रिटनमधील विविध शस्त्रप्रदर्शनांच्या वार्तांकनात स्थानिक ब्रिटिश वृत्तपत्रांनीही तसेच म्हटले होते. असेही मुनगंटीवार म्हणाले.
तो ‘खर्च संग्रहालयाच्या डागडुजीचा’
यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी पाचनको आणण्यासाठी झालेल्या खर्चावरील प्रश्नांवरही खुलासा केला. वाधनखांसाठी ना कुणी भाडे मागितले, ना कुठले भाडे देण्यात आले.
वाघनखे आणण्यासाठी एका धन आणण्यासाठी एका १४ लाख ८ हजार रुपये इतकाच खर्च आला आहे. वाघनखे ठेवण्यासाठी सात कोटी खर्च येणार आहे. असे म्हटले जात आहे.
मात्र, हा खर्च ज्या ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रे ठेवण्यात येणार आहेत, त्या संग्रहालयाच्या डागडुजीचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
१९ जुलै रोजी वाघनखे साताऱ्यात
सातारा येथील संग्रहालयात १९ जुलै रोजी सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचे दर्शन घेता येणार आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, सरदार आणि त्यांच्या दंशजांना निमंत्रित करण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटनही यावेळी होणार आहे. लवकरच शिवराज्याभिषेकाची माहिती देणारी पुस्तिका शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.