
Spicejet employee vs CISF : स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने ‘जयपूर’ jaipur आंतरराष्ट्रीय विमानतळावर internation airport सीआयएसएफ CISF जवानाला थप्पड मारल्याची घटना समोर आली आहे. एअरलाइनची airline महिला कर्मचारी वाहनाच्या गेटमधून जबरदस्तीने आत येण्याचा हट्ट धरून बसली होती. तिला प्रवेशास नकार दिल्याने तिने सीआय गिरिराज प्रसाद ci giriraj prasad यांच्यावर हात उचलला.
याची तक्रार करताच पोलिसांनी आरोपी महिला कर्मचारी अनुराधा राणीला anuradha rani ताब्यात घेतले. स्पाइसजेटने spicejet म्हटले की, ही घटना दुर्दैवी आहे. पण, आमच्या कर्मचाऱ्याला सीआयएसएफ cisf कर्मचाऱ्यांकडून अयोग्य भाषेचा सामना करावा लागला. कर्मचाऱ्याकडे वैध विमानतळ प्रवेश पास होता, असे असतानाही तिला आतमध्ये प्रवेश दिला नाही.