हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
वाढोणा शिवारात प्रेमातून दोघांची गळफास घेऊन आडगाव राजा गावाचा संताप उफाळला! BSNL–Airtel नेटवर्क Ladki Bahin Yojana : उद्यापासून खात्यात 1500 रुपये… पण एक अट सरपखेड–धोडप बुद्रुक रस्ता 10 वर्षांपासून खड्दुसरबीड जवळ भीषण अपघात; लग्नावरून परतणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! १५ दिवसांत ११ हजार

भोकरदन मध्ये ‘वंदे मातरम’ शताब्दी महोत्सवाचा भव्य जल्लोष — विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

On: November 8, 2025 7:45 AM
Follow Us:

भोकरदन प्रतिनिधी : संजीव पाटील 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकरदनमध्ये स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांच्या नामकरणानुसार ‘वंदे मातरम’ गीतगायन शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात नायब तहसीलदार अविनाश पाटिल अध्यक्षस्थानी होते, तर अधिवक्ता हितेश मेहता यांनी देशभक्तीचा संदेश देत उपस्थितांना संबोधित केले.

या वेळी वंदे मातरम समिती सदस्य, गटशिक्षण अधिकारी, पत्रकार, शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थीही उत्साहाने सहभागी झाले आणि ‘वंदे मातरम’ गायनाने परिसर भावपूर्ण वातावरणात न्हालला.

प्रमुख शाळा ज्या कार्यक्रमात सहभागी झाल्या त्यात अक्षरज्योती इंग्लिश स्कूल, श्री गणपती इंग्लिश स्कूल, पायोनियर इंग्लिश स्कूल, गुरुकुल इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल भोकरदन, शिवा प्राथमिक विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इत्यादींचा समावेश होता.

हे पण वाचा.

भोकरदन बसस्थानकावर सुरक्षारक्षकाने वृद्धास केली बेदम मारहाण; 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू.

संस्थेतील सर्व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बारोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एस. खरात यांनी केले.

या शताब्दी महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढवली आणि परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सशक्त संदेश दिला.

👉अधिक माहिती आणि अद्यतने मिळवण्यासाठी Kattanews.in ला भेट द्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!