हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा : पाडळी रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू!

On: November 6, 2025 8:32 AM
Follow Us:

बुलढाणा प्रतिनिधी/भागवत गायकवाड :

बुलढाणा शहरातील पाडळी रोडवर झालेल्या भीषण अपघातात बुलढाणा परिसरातील 27 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे गणेश अशोक शेजोळ (वय 27) रा. पाडळी, बुलढाणा यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शेजोळ हे रात्रीच्या सुमारास पाडळी रोडवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच घटनास्थळीच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तात्काळ त्यांना गावातील नागरिकांच्या मदतीने बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांना मयत घोषित केले.

या प्रकरणात धनंजय भास्कर शेजोळ (वय 21, रा. पाडळी) यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अपघात करणारा वाहनचालक हा निष्काळजीपणे वाहन चालवत होता व अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

हे पण वाचा.

देऊळगाव राजा जवळ भीषण अपघात; कार पुलावर आदळत चुराडा! एक जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

बुलढाणा ग्रामीण पोलिसांकडून घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून वाहनचालकाचा शोध लागण्याची शक्यता वाढली आहे. या घटनेने पाडळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

👉 अशाच स्थानिक अपडेट्ससाठी Kattanews.in ला Follow करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

Leave a Comment