हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
छत्रपती संभाजीनगरहून नोकरीच्या मुलाखतीवरूनBuldhana : पिंप्री माळेगावात दूषित पाण्यामुळे ८० ह“चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, बदल्यगोविंदाचं मराठी अभिनेत्रीशी अफेअर? सुनिता अहस्मृती मंधाना मराठी आहे का? | Is Smriti Mandhana Marathi? | Marathi Connectiचिखली ठाणेदार भुषण गावंडेंच्या धडाकेबाज कार

Buldhana : पिंप्री माळेगावात दूषित पाण्यामुळे ८० हून अधिक लोकांना अतिसाराची लागण; आरोग्य प्रशासन तज्ज्ञ दाखल.

On: October 23, 2025 5:15 PM
Follow Us:
Buldhana

Buldhana : पिंप्री माळेगाव येथे दूषित पाणी पिल्यामुळे ८० हून अधिक ग्रामस्थ डायरीया आणि उलट्यांमुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून लोकांना जुलाब व पोटदुखीचा त्रास होत होता, मात्र आरोग्य प्रशासनाला याची माहिती नाही. रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर आरोग्य पथक गावात दाखल झाले.गावाची लोकसंख्या अंदाजे २,००० आहे.

गावात १४० गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी टाकीत आणले गेले, परंतु कमी दाबामुळे पाणी टाकीपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे लोकांनी नाईलाजाने सार्वजनिक विहिरीतून पाणी भरणे सुरू केले, जेथे जवळच्या नाल्याचे सांडपाणी मिसळले होते. शिवाय पाईपलाइनमध्ये लिकेज असल्याने पाणी दूषित झाले.गेल्या १५ दिवसांपासून नागरिकांना पोटदुखी, उलटी, जुलाब यांचा त्रास सुरू झाला.

खासगी रुग्णालयात उपचार

वरवट बकाल येथील दोन डॉक्टरांच्या खासगी रुग्णालयात ५० रुग्णांनी उपचार घेतले. हे रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर सुरक्षित पाणी वापरत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखलविहिरीचे दूषित पाणी पिणाऱ्यांमुळे आणखी २५ रुग्णांना वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले.

आरोग्य पथकाची कारवाई

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मारोडे, डॉ. योगेश कड, डॉ. दाणे, साथरोग आरोग्य सहायक अभिजीत पाटील, आरोग्य सेवक घोरसडे, बारबुधे, इंगळे, खोडके यांनी गावात दाखल होऊन विहिरीची तपासणी केली.ग्रामपंचायत प्रशासनाला विहिरीच्या परिसराची साफसफाई करण्याचे आणि नियमित ब्लिचिंग पावडर वापरण्याचे सूचनाही दिल्या.

सरपंचांच्या प्रयत्नांमुळे पाणीपुरवठा सुधारण्याचा प्रयत्नसरपंच शांताराम चिकटे आणि सहकाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून टाकीपर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कमी दाबामुळे थेट टाकीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही, त्यामुळे विहिरीच्या पाण्याचा वापर अनिवार्य झाला.गावकऱ्यांनी स्वच्छ पाणी मिळविण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकणे सुरू केले असून, आरोग्य पथक सतत ग्रामस्थांवर लक्ष ठेवत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!