KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

हवा तपासत असताना समृद्धी महामार्गावर ट्रकखाली क्लीनर ठार; कारमधील महिला गंभीर जखमी

On: October 23, 2025 10:33 AM
Follow Us:
हवा तपासत असताना समृद्धी महामार्गावर ट्रकखाली क्लीनर ठार; कारमधील महिला गंभीर जखमी

KattaNews जाहिरात 1

सिंदखेड राजा तालुका/प्रतिनिधी

KattaNews जाहिरात 2

समृद्धी महामार्गावर आज सकाळी दोन गंभीर अपघात घडले, ज्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आणि दुसरी गंभीर जखमी झाली. या घटनांनी स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ निर्माण केली असून, प्रशासनाने तातडीने घटनास्थळी हस्तक्षेप केला आहे.

KattaNews जाहिरात 3

पहिला अपघात: कार कंटेनरवर आदळली, महिला गंभीर

मुंबईहून नागपूरकडे निघालेली एमएच-०२-जीपी-११३० क्रमांकाची कार समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २९८ जवळ एमएच-४८-डीसी-२१३७ क्रमांकाच्या कंटेनरवर धडकली. या अपघातात कारमधील कविता हुंगे (वय ५०) गंभीर जखमी झाल्या.तात्काळ त्यांना मेहकर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वैद्यकीय तज्ज्ञ त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती, परंतु पोलिसांनी मार्ग सुकर केला.

KattaNews जाहिरात 4

दुसरा अपघात: ट्रकखाली क्लीनर चिरडला

सकाळी साडेनऊ वाजता चॅनल क्रमांक ३२१.३ जवळ दुसरा भयानक अपघात घडला. कोलकाता येथून आलेला डब्ल्यूबी-२५-एल-६२५६ क्रमांकाचा ट्रक मुंबईकडे निघालेला होता.चालक अयुब अली मंडल (वय ३५, पश्चिम बंगाल) यांनी ट्रक थांबवून मागील टायरची हवा तपासली. या वेळी क्लीनर शाहरुला मंडल (पश्चिम बंगाल) खाली उतरल्यानंतर ट्रक अचानक पुढे सरकला आणि तो टायरखाली चिरडला. घटना अत्यंत धक्कादायक ठरली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला.

सिंदखेड राजा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन तपास सुरू केला आहे. प्रशासनाने नागरिकांना रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

खडकपूर्णा प्रकल्पातील शेतीच्या मोटारी बंद करण्याच्या प्रयत्नाला विरोध करणारे शेतकरी

आधी अवैध रेती उपसा बंद करा, मगच मोटारी बंद करा! खडकपूर्णा प्रकल्पावर शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा

अमडापूर शिवारात गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात तीन जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी पथकाची संयुक्त कारवाई

अमडापुरात गोठ्यात सुरू होता अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार! तीन जिल्ह्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई; पिता-पुत्रासह तिघांना अटक

घाटबोरी येथे चोरीला गेलेले सोयाबीनचे कट्टे

घाटबोरीत शेतकऱ्याला मोठा फटका! गोडाउनबाहेरचे १६ कट्टे सोयाबीन चोरीला

साखरखेर्डा येथील गायखेडी तलावातून अवैध पाणी उपशावर कारवाई करताना महसूल अधिकारी

साखरखेर्ड्यात महसूल विभागाची धडक कारवाई; गायखेडी तलावातून पाणी उपसा करणारे १० मोटारपंप जप्त

चिखली नगरपरिषदेच्या प्रस्तावित बॉम्बे मार्केट BOT प्रकल्पाशी संबंधित बाजारपेठ

पाच मिनिटांत २१ विषय मंजूर? चिखली नगरपरिषदेच्या सभेवर विरोधकांचे गंभीर आक्षेप

साखरखेर्डा परिसरातील पाझर तलाव आणि वन्यजीवांसाठी पाणीसाठ्याचा प्रश्न

साखरखेर्डा परिसरात पाझर तलावांचा पाणीसाठा धोक्यात! वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, उपसा मात्र सुरूच

Leave a comment