वाशीम : रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथे एका व्यक्तीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 

 

वाशीमवाशीम

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

 

 

वाशीम : रिसोड तालुक्यातील ‘भोकरखेडा’ bhokrkheda येथील गावाशेजारील शेतातील विहिरीमध्ये गावातीलच एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर २०२४ च्या सकाळी ११ वाजता उघडकीस आली. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, भोकरखेडा येथील रहिवासी नामदेव शंकर रंजवे वय ४५ वर्ष हे २२ ऑक्टोबर २०२४ च्या सायंकाळी सहा वाजेपासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी भोकरखेडा येथील आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत.

 

 

 

२३ ऑक्टोंबर २०२४ च्या सकाळी ११ वाजता गावाशेजारील असलेल्या लक्ष्मण नारायण रंजवे यांच्या शेतातील विहिरीमध्ये नामदेव शंकर रंजवे यांचे प्रेत तरंगत असल्याचे दिसले. त्यांच्या नातेवाईकांनी व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती रिसोड पोलीस स्टेशनला देताच रिसोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व नामदेव शंकर रंजवे यांचे प्रेत शव विच्छेदनासाठी रिसोड risod येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. नामदेव शंकर रंजवे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नसून त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.