washim : रस्त्याने झाला अंधार, डोळस झाले अंध, नेहमीचेच झाले ऋणानुबंध !

washim

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

washim : रिठद rithad गावांमध्ये राज्य मार्ग ५१ बसस्थानक ते रिठद rithad गावापर्यंत येणाऱ्या रस्त्याने मोठ्या पूलावरुन जाणाऱ्या मार्गावर संपूर्ण लाईट बंद राहतात.हे लाईट १०-१२दिवसापासून बंद स्थितीत आहेत.परंतू ग्रामपंचायत अधिकारी यांना याबाबत माहिती देऊनही लाईट न लागल्याने दररोज ये-जा करणाऱ्या वाटसरुना अंधाराचा त्रास होत आहे.रसत्यालगत शेती व झाडी,नदीचा किनारा असल्याने सापही या रस्त्यावर येऊ शकतात.त्यामुळे जीवीतहानी होऊ शकते.व गावाजवळील लहान पूलावरुन नेहमीच पाणी वाहात असल्याने व पूलावरील भाग शेवाळल्याने घसरुन पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

 

त्यामुळे मोठ्या पूलावरुन जावं लागते,या रस्त्याने जाण्यासाठी लाईट बंद असतात, रस्त्याने अंधार पडला आहे.डोळस माणसाला सुद्धा लाईट बंद असल्याचे दिसत नाही.हे तर सर्वच दिसून डोळ्यांवर पापंनी ओढून घेतल्यागत अवस्था, डोळस माणसांनी निर्माण केली.सद्यास्थीतीत सोयाबीन सोंगणीची वेळ असल्याने शेतकऱ्यांना व मजुरांना शेतातून येण्यासाठी उशीर होत आहे.घरी येतांना या अंधारातच घराची वाट धरावी लागते.याबाबत ग्रामपंचायतचे सन्माननीय पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी दखल घेतील अशी अपेक्षा शेतकरी व मजूर वर्गाला आहे..प्रकाशाच्या प्रतिक्षेत…