महाराष्ट्रातील बदलापूर, अकोला शहरामध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ.

 

 

नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी 

 

बदलापूर,अकोला बलात्काराच्या घटनेच्या संदर्भात, रिसोडच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पं.स.रिसोड तथा ठाणेदार, पोलिस स्टेशन रिसोड. यांना दिनांक २१/८/२०२४ रोजी निवेदन दिले यामध्ये महाराष्ट्रात तीन वर्षाच्या मुलीवर सुद्धा नराधमाने बलात्कार करून सोडले नाही, महाराष्ट्रात महिलावर घडत असलेल्या बलात्काराबाबत शासन आणि गृहविभाग गंभीर नाही, अशा घडत चाललेल्या अत्याचाराच्या घटना पाहता या बाबीची आस प्रत्येक जिल्ह्यात लागू नये,

 

 

त्याबद्दल रिसोड शहरातील सामाजिक जाण असणारा पालकवर्ग यांचे माध्यमातून प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवावेत, जेथे सीसीटीव्ही आहेत तेथे चालू आहेत की नाहीत,याबाबत तपासणी करावी व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने सुद्धा सतर्कता बाळगणे काळाची गरज आहे त्याबातची मागणी रिसोड शहरातील मयूर पावडे, पृथ्वीराज सूर्यवंशी, विशाल सरोदे, अजय चौरे, पंकज जिरवणकर,विलास फुके, श्रीराम सरोदे, उमेश सरोदे

 

 

इत्यादी जागरूक तरुणांनी याबाबतचे निवेदन देऊन शहानिशा करण्यास सांगितले याबाबत रिसोडच्या तहसीलदार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी रिसोडचे ठाणेदार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून याबाबत विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा, महाविद्यालय यांना याबाबत अवगत करण्यासाठी निवेदनाची दखल घ्यावी अशी अपेक्षा पालक वर्गातून होत आहे.