सलमान नसीम अत्तार/चांडोळ प्रतिनिधी
चांडोळ: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अंत्यत कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा होतो त्या योजनेचा लाभ घेण्यार्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारने ई केवायसी करण्याची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्याचा शोध ई केवायसीतुन घेतला जाणार आहे. ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी ३१ आॅक्टोबर पर्यत मुदत देण्यात आली असून ई केवायसी न केलेल्यांचे रेशन धान्य १ नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ई केवायसीचे बंधन लावण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापुर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र तरी देखील अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन १ नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. तत्पूर्वी ई केवायसी करण्यासाठी ३१ आॅक्टोंबर पर्यत अंतिम मुदत देण्यात आली आहे जर शिधापत्रिका धारकांने ३१ आॅक्टोबर पर्यत ई केवायसी पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही.
e kyc कुठे करायची
शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पाॅस डिजीटल यंत्रणा मध्ये आधार क्रंमाक सिडिंग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेंकदांची ही प्रक्रिया असून ई केवायसी पुर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थ्याच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. स्थलांतरित कुंटुबाने देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई केवायसी (ekyc) अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे व उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक दुकानात ही प्रक्रिया सूरू असून शिधापत्रिका धारकांनी ई केवायसी करून घ्यावी.
शिधापत्रिका धारकांना अन्न,नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार आवाहन करण्यात आले आहे की,शिधापत्रिका मधील कोणी सदस्य मयत झालेली आहे. परंतू त्यांची नाव शिधापत्रिकेमधुन वगळण्यात आलेली नाही. अशा सदस्यांचे नावे तात्काळ कमी करण्यासाठी शिधावाटप कार्यालयाला संपर्क करावा.नाव कमी करण्यासाठी मयताचा मृत्यू दाखला,आधार कार्ड, शिधापत्रिका सोबत आणावे. तसेच कुटुंबातील जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांचे आधार घेऊन सत्यापन करुण सक्तीचे आहे न केल्यास त्याला जबाबदार संबंधित शिधापत्रिका जबाबदार राहील.