वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : मालेगाव malegaon तालुक्यातील सुदी शेत शिवारात दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात होऊन त्यामध्ये वीज पडली व यामध्ये प्रकाश मनोहर कांबळे या मजुराचा मृत्यू झाला व इतर दोन मजूर जखमी झाले. ९ ऑक्टोबर २०२४ ला. सोयाबीन कापणीसाठी आलेले पुसद pusad तालुक्यातील मजूर प्रकाश मनोहर कांबळे prakash manohar kambale वय वर्षे ३२ हे सुदी तालुका मालेगाव malegaon येथील शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन कापणी करिता आले होते.
दरम्यान दुपारी दोन ते तीन वाजे दरम्यान अचानक पाऊस आला व त्यामध्ये विजेच्या कडकडण्यासह सोयाबीन सोगतांना शेतात प्रकाश कांबळे prakash kambale यांच्या अंगावर ‘वीज’ पडली व शेजारी असलेले दोन सहकारी ते सुद्धा जखमी झाले परंतु या दरम्यान प्रकाश मनोहर कांबळे यांचा मृत्यू झाला त्यांना दवाखान्यात नेण्यात आले परंतु मृत्यू झाल्याने ते हयात राहू शकले नाही प्रकाश मनोहर कांबळे यांना एक मुलगा व दोन मुली असल्याचे समजते ते आपल्या उदरनिर्वाहासाठी यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात आले होते. हा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे शेतकरी व परिसरातील लोकांना याबाबत दुःख झाले.